कार्ती चिदंबरम यांना 16 एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली – एअरसेल मार्क्‍सिस प्रकरणात कार्ती चिंदंबरम यांना 16 एप्रिल पर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. हे प्रकरण 2 जी घोटाळ्याशी संबंधीत प्रकरण असून त्या प्रकरणी सीबीआय आणि ईडीने कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना या प्रकरणात अटकेची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी न्यायालयात त्या संबंधात संरक्षण मागितले होते त्या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना हे संरक्षण दिले आहे.

या प्रकरणात कार्ती चिंदंबरम यांनी अटकपुर्व जामीनासाठीही अर्ज केला असून त्या विषयी विशेष न्यायालयाचे न्यायाधिश ओ. पी. सैनी यांनी संबंधीत तपास यंत्रणांना आपली भूमिका मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. तो पर्यंत त्यांना अटक केली जाऊ नये असे न्यायालयाने संबंधीत यंत्रणांना बजावले आहे त्याचवेळी न्यायालयाने कार्ती यांना कोर्टाच्या परवानगी शिवाय देश सोडून न जाण्याचीही सुचना केली आहे. कार्ती यांना कालच आयएनएक्‍स मिडीया प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यांना आता या दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाण्याची शक्‍यता होती.

आज झालेल्या सुनावणीच्यावेळी कार्ती यांचे वडिल व माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांच्या पत्नी नलीनी चिदंबरम याही उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)