कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

कार्ती चिदंबरम यांना अखेर जामीन
नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. कार्ती यांना या प्रकरणात 28 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत उद्या संपत होती. तथापि, आज त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दहा लाख रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली असून सीबीआयच्या अनुमतीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशी अट त्यांना घालण्यात आली आहे.

कार्ती चिदंबरम हे प्रभावशाली व्यक्‍ती असल्याने ते या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यास सीबीआयने न्यायालयात विरोध केला होता. तथापि, या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही. कारण याप्रकरणी सीबीआयने अद्याप कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी केलेली नाही किंवा कोणताही सरकारी कर्मचारी या प्रकरणात आरोपी नाही, असे प्रतिपादन कार्ती यांच्या वकिलाने केले.

आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला विदेशातून गुंतवणूक आणण्यासाठी जी सरकारी परवानगी देण्यात आली त्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा सीबीआयचा आरोप होता. नंतर त्यांनी साडेचार कोटी रुपयांची लाच घेतली, असा आरोप सीबीआयने केला आहे. त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)