कार्ती चिदंबरम यांना ईडीचा झटका ! ५४ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याची ५४ कोटींची मालमत्ता ईडीने कडून जप्त करण्यात आली आहे. तसेच कार्तीच्या इंग्लंड, स्पेन आणि ऊटीतील बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्यावर काहीदिवसांपूर्वी सीबीआयने एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहार प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

सुमारे 305 कोटी रुपयांचे आयएनक्‍स मिडीया प्रकरण आणि 3.500 कोटी रुपयांच्या एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणामधील कार्ती चिदंबरम यांचा सहभागावरून सीबीआयने कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुद्धा केली होती. “युपीए 1′ सरकारच्या कार्यकाळामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना “फॉरेन एक्‍सचेंज प्रमोशन बोर्ड’ने या दोन्ही कंपन्यांना मंजूरी दिली होती. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे सीबीआयला आढळून आले होते.

दरम्यान, ५४ कोटींची मालमत्ता जप्त करत ईडीने कार्ती चिदंबरम यांना झटका दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)