कार्ती चिदंबरमची दुसऱ्यांदा चौकशी

नवी दिल्ली – एका गैरव्यवहार प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची आज सीबीआयने दुसऱ्यांदा चौकशी केली. सीबीआय मुख्यालयात त्यांना आज बोलावून घेण्यात आले होते. त्यानुसार ते तेथे साडे अकरा वाजता उपस्थित राहिले.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीच्या एका मिडीया कंपनीला विदेशी गुंतवणुकीसाठी अनुमती मिळवण्याच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयचा संशय असून या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची चौकशी केली जात आहे.

कार्ती चिदंबरम हे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पी चिदंबरम यांचे चिरंजीव आहेत. या प्रकरणात भास्कर रामन, रवी विश्‍वनाथन आणि मोहन राकेश हे अन्य तीन जणही आरोपी आहेत त्यांनाही सीबीआयने आज चौकशीसाठी बोलावले होते. या आधी 23 ऑगस्टला सीबीआयने कार्ती यांची चौकशी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)