कार्तींची कधी चौकशी करणार ; तारीख कळवा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: आयएनएक्‍स मेडिया गैरव्यवहार प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची तुम्हाला कधी चौकशी करायची आहे त्याची तारीख येत्या 30 जानेवारी पर्यंत कळवा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली विभागाला केली आहे. ईडीला कार्ती यांच्याकडे या प्रकरणात चौकशी करायची आहे त्यांना विचारून तुम्ही तारीख ठरवा आणि आम्हाला कळवा असा आदेश आज न्यायालयाने दिला.

कार्ती यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करून विदेश दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांना चार देशांमध्ये विविध कामांसाठी जायचे आहे त्याला काही महिने लागण्याची शक्‍यता आहे त्यामुळे आपल्याला तशी अनुमती द्यावी अशी मागणी करणारी याचिका कार्ती यांनी केल्यानंतर त्या अनुषंगाने न्यायालयाने ईडीकडे ही विचारणा केली आहे. आम्हाला दोघांचीही सोय पहायची आहे तुम्हाला चौकशी साठी कार्ती यांना उपलब्ध करून द्यायचे आहे आणि कार्ती यांच्या विदेश दौऱ्यालाही अनुमती द्यायची आहे त्यामुळे तुम्ही ईडीला विचारून चौकशीची तारीख निश्‍चीत करा अशी सुचना आज झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारच्या वकिलांना केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)