कार्ति चिदंबरम यांना 2 मे पर्यंत दिलासा

नवी दिल्ली – एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणामध्ये कार्ति चिदंबरम यांना 2 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. कार्ति चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्वी जामिन अर्जावरच्या युक्तिवादासाठी सक्तवसुली संचलनालयाच्या वकिलांनी युक्तिवादासाठी अधिक वेळ मागून घेतल्यामुळे विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांनी चिदंबरम यांना हा दिलासा दिला आहे.

सीबीआयच्या वकिलांनीही या प्रकरणी सुनावणीसाठी पुढील तारिख मागून घेतली होती. अटकपूर्व जामिनावरच्या युक्तिवादासाठी “ईडी’ आणि “सीबीआय’च्या वकिलांनी अधिक वेळ मागितल्यामुळे न्यायालयाने 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कार्ति चिदंबरम यांना आजपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणी “ईडी’ने 2011 साली तर “सीबीआय’ने 2012 साली कार्ति चिदंबरम यांच्याविरोधात प्रकरण दाखल केले होते. पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेलमधील गुंतवणूकीसाठी मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिस लिमिटेड कंपनीला “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डा’ची मंजूरी कार्ति यांच्यामुळे मिळाल्याचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)