कार्तिक-कृतीची “लुका छुप्पी’

बॉलीवूडमधील युवा अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सॅननच्या आगामी “लुका छुप्पी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यावर आधारित आहे. मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

“लुका छुप्पी’द्वारे कार्तिक आणि कृती ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. हा एक रोमॅन्टीक कॉमेडी चित्रपट असून यात जोडप्याला लिव्ह इनमध्ये राहायचे आहे. परंतु हे दोघेजण आपले लग्न झाले आहे, असे सांगून लिव्ह इनमध्ये राहत असतात. यानंतर त्यांच्या या गोष्टीत दोघांच्या कुटुंबांची एन्ट्री होते. त्यानंतर मोठी धम्माल घडते, असे या चित्रपटाचे सिम्पल कथानक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्ष्मण उतेकर या चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करत आहेत. याअगोदर उतेकर यांनी मराठीत “टपाल’ आणि “लालबागची राणी’ या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच हिंदीत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने “डिअर जिंदगी’, “इंग्लिश विंग्लिश’, “ब्लू’, “102 नॉट आऊट’, तेवर या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. दरम्यान, “लुका छुप्पी’मध्ये कार्तिक-कृतीसह अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)