कार्तिक आर्यन नाही तर सुशीलकुमार शिंदेंचा नातू साराचा बॉयफ्रेंड….!

सारा अली खानने गेल्याच वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. “केदारनाथ’ हा सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्यानंतर रणवीर सिंह बरोबर “सिंबा’ मधील तिच्या रोललाही चांगली दाद मिळाली. स्टार किड्‌समध्ये ती अगदी आघाडीवर आहे. त्यामुळे तिच्याबाबतची चर्चा होणारच.

करण जोहरच्या कॉफी शो मध्ये तिने कार्तिक आर्यनबरोबर डेटिंगला जायला आवडेल, असे म्हटले होते. मात्र आता तिने आपण आतापर्यंत एकाच व्यक्‍तीबरोबर डेटिंग केले असल्याचे सांगितले आहे. तिने आपला खरा बॉयफ्रेंड कोण आहे, हे जाहीर करून सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. हा लकी चॅम्प दुसरा, तिसरा कोणी नसून वीर पहेरीया आहे. वीर हा कोणी बॉलिवूड अॅक्‍टर नाही, तर माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मग आता सारा आणि वीरमध्ये काही कनेक्‍शन का उरले नाही? वीरने साराचे मन दुखावले का, असे विचारले तर साराने त्याला नकारार्थी उत्तर दिले. मला कोणीही दुखावलेले नाही. मी एकदम ठीक आहे. बस्स…! एवढेच तिने सांगितले.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे तर सारा सध्या पप्पा सैफ अली खानबरोबर “लव आज कल’च्या सीक्‍वेलमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर दुसरे तिसरे कोणी नाही, तर तिचा ड्रीम बॉय कार्तिक आर्यन असणार आहे. मात्र अद्याप साराने या सिनेमाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तशी अधिकृत घोषणा तर तिने “कार्तिक की वीर’ या प्रश्‍नाचीही केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)