कार्तिक आणि अनन्या पांडेचे डेटिंग

सोनू के टिटू की स्वीटी मुळे हिट झालेल्या कार्तिक आर्यन आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांच्यात हल्ली खूप जवळीक वाढायला लागली असल्याचे दिसते आहे. या दोघांना अनेक वेळेस एकत्र बघितले गेले आहे. अलिकडेच एका रेस्टॉरंटमधून हे दोघे एकत्र बाहेर पडताना त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आहे की काय, अशी शंका यायला लागली आहे. अनन्याने अद्याप बॉलिवूड करिअरला सुरुवात केलेली नाही. “स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून ती पदार्पण करणार आहे. त्यानंतर तिच्या करिअर ग्राफवर या समीकरणाचे भविष्य अवलंबून असणार आहे.

अलीकडेच “कॉफी विथ करण’मध्ये सारा अली खान पप्पा सैफ अली खानबरोबर आली होती. तेंव्हा करणच्या प्रश्‍नाला उत्तर देताना तिने कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल, असे सांगितले होते. कार्तिक आर्यननेही त्यावर आपला आनंद व्यक्‍त केला होता. आता साराच्या पाठोपाठ अनन्या पांडेच्या फेव्हरेट लीस्टमध्ये तो समाविष्ट झाला की काय असे वाटायला लागले आहे. कार्तिकसाठी गर्लफ्रेंडबरोबर फोटो काढणे ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी त्याच्या बरोबर एका गर्लफ्रेंडचे फोटो अनेकवेळा व्हायरल झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनन्या पांडेबरोबर कार्तिकचे अफेअर सुरू असल्याच्या बातम्या जशा जशा पसरायला लागल्या, तसे कार्तिकने लगेच त्यावर खुलासाही देऊन टाकला आहे. अनन्या आणि आपण केवळ डिनरसाठी एकत्र गेलो होतो. आम्ही चांगले मित्र आहोत. नेहमीच कुठे तरी बाहेर जात असतो. त्यानुसार आम्ही जेवायला बाहेर गेलो होतो. त्यामध्ये काहीही वेगळे नाही, असे स्पष्टीकरण त्याने दिले. कार्तिकने “प्यार का पंचनामा’मधून पदार्पण केले होते. त्यानंतर “आकाशवाणी’, “कांची’, “प्यार का पंचनामा 2′, “गेस्ट इन लंडन’ आणि “सोनू की टिटू की स्वीटी’ सारख्या हिट सिनेमांमधून काम केले आहे. आगामी “लुका छुपी’मधून तो कृती सेननबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)