कार्तिकी एकादशीनिमित्त देहूत भाविकांची गर्दी

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथे कार्तिकी एकादशी निमित्त सोमवारी (दि. 3)संपन्न होणाऱ्या एकादशी दिनी भाविकांची गर्दी वाढली होती. मुख्य मंदिरामध्ये भाविकांची दर्शनबारीने दर्शन घेण्यासाठी सुविधा करण्यात आली होती. सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तीर्थक्षेत्र आळंदी येथे संपन्न होत असणारा संत ज्ञानेश्‍वर माउलींची संजीवन समाधी सोहळ्यास राज्यभरातून लाखो भाविक दर्शनार्थ येत असतात. हे भाविक श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या दर्शनार्थ देहू-आळंदी करत असतात. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या एकादशीच्या पूर्वसंध्येला अनेक भाविक देहूत दाखल झाले होते. सोमवारी संपन्न होत असलेल्या एकादशीला संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनानंतर आळंदीकडे प्रस्थान करीत होते. अनेक भाविक संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे दर्शनानंतर देहूत दाखल होत होते.

-Ads-

पहाटेपासूनच इंद्रायणीच्या नदी घाटावर स्नानासाठी भाविक, वारकरी जमले होते. रात्री मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांनी उभारलेल्या राहूट्या, मंडप, धर्मशाळा आदी विविध ठिकाणी अखंड हरिनाम गजर सुरू होता. हरीचा जय घोष, अभंग कीर्तन सुरु असल्यामुळे परिसर भक्‍तीमय वातावरणात न्हावून निघाला होता. पहाटेच्या थंड-गारव्यामध्येही भाविकांनी इंद्रायणीतीरी स्नानासाठी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्य मंदिरातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर व श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरामध्ये दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.

संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज मोरे, विश्‍वस्त सुनील दामोदर मोरे, सुनील दिगंबर मोरे, अभिजीत बाळकृष्ण मोरे, अशोक निवृत्ती मोरे, जालिंदर विश्‍वनाथ मोरे, विठ्ठल बाबुराव मोरे यासह महाराजांचे वंशज, माजी अध्यक्ष विश्‍वस्त, विविध संघटना, सामाजिक संस्था, प्रशासनाने आदींनी मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे व भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास उपस्थित राहत सज्ज होते. भाविक वारकरी यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)