कार्तिकीवारीसाठी आजपासून जादा बसेस

30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत 124 जादा गाड्या सोडणार

पुणे – कार्तिकी एकादशीला श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची संजीवन समाधी सोहळा होणार आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या स्थानकांवरून आळंदीसाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

या सोहळ्यासाठी शुक्रवारपासून (दि.30) आळंदीत येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी होते. यामुळे दि. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान मार्गावरील सध्याच्या 77 सह 124 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी-चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या ठिकाणांहून आळंदीला जाण्यासाठी ही बससेवा असणार आहे.

आवश्‍यक गरजेनुसार रात्री जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान, रात्री दहानंतर जादा बससेवेसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरापेक्षा 5 रुपये जादा पैसे आकारण्यात येणार आहेत. तसेच महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक यासह इतर पासधारकास यात्रा कालावधीत रात्री अकरानंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करता येणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक 364 मनपा ते बहुळगाव हा मार्ग यात्रेच्या काळात बंद राहणार आहे. तर मार्ग क्रमांक 257 वाघोली ते आळंदी या मार्गावरील बस मरकळ रोडवरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून सुटेल. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन पीएमपीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिली जाणारी सेवा
सद्यस्थितीतील दैनंदिन गाड्या – 77
यात्रेनिमित्त जादा गाड्या – 124
2 ते 5 डिसेंबरदरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)