“कार्तिकी’निमित्त आळंदीत वाहतूक बदल

– 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधीत अंमलबजावणी

पिंपरी – कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीमध्ये वाहतूक बदल करण्यात येणार असून हा बदल 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांना यातून मुभा देण्यात आली आहे.

आळंदी येथे कार्तिकी एकादशी यात्रा व संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा समाधी सोहळा या उत्सव काळात आळंदी येथे येणाऱ्या हजारो भाविकांचा विचार करता, गर्दी टाळण्यासाठी दिघी-आळंदी या वाहतूक विभागातर्फे आळंदीकडे येणाऱ्या मार्गात बदल केले आहेत.

पुणे-आळंदी रस्ता बंद असणार असून त्याला पर्यायी मार्ग हा पुणे-दिघी मॅगेझिन चौक हा असणार आहे. मोशी-देहुफाटा रस्ता बंद असून नागरिकांना यासाठी मोशी-चाकण-शिक्रापूर किंवा मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक- दिघी या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. तसेच हवालदार वस्ती मोशी या मार्गा ऐवजी मोशी-हवालदार वस्ती- भोसरी या मार्गाने नागरिकांनी वाहतूक करावी, चाकण -आळंदी रस्ता बंद असणार असून त्याला पर्यायी मार्ग म्हणून पुण्याला जाण्यासाठी चाकण- मोशी मॅग्झिन चौक-दिघी-पुणे किंवा चाकण पिंपळगाव फाटा – मरकळ-लोणीकंद (सोलापूर हायवे) याचा वापर करावा. तसेच वडगाव – घेणंद- आळंदी रस्त्याऐवजी वडगाव-घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण- नाशिक हायवे रेडने पुणे हा मार्ग वापरावा, मरकळ -आळंदी रस्त्यासाठी मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द (पी. सी. एस. कंपनी फाटा) बायपास रोडने चऱ्होली बुद्रुक ते पुणे असा प्रवास करावा. तर चिंबळी -आळंदी रस्ता बंद असणार असून चिंबळी- मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी असा वापर करावा.

या दरम्यान आपत्कालीन मार्ग म्हणून वाहतूक पोलिसांनी आळंदी- चाकण चौक ते इंद्रायणी रुग्णालय-चाकण असा खुला ठेवण्यात येणार आहे. यावेळी बाहरुन येणाऱ्या तसेच दिंडी सोबत येणाऱ्या इतर वाहनांनाही आळंदीमध्ये पूर्ण प्रवेश बंद असून केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठी सर्व मार्ग खुले राहणार आहेत असे दिघी-आळंदी वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या पत्रकात सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)