“कार्ड ब्लॉक’च्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी – क्रेडीट कार्ड ब्लॉक झाले असून त्याचा रिफंड देण्याच्या बहाण्याने इसमाची 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 16 नोव्हेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली.

याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय गायकवाड (वय-39, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून 7838221920 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांना एकाने फोन केला. आयसीआयसीआय बॅंकमधून बोलत असल्याचे सांगून तुमचे क्रेडीट कार्ड ब्लॉक झाले असून त्याच्या रिफंडसाठी गायकवाड यांचा डेबीट कार्ड क्रमांक मागितला. तो मिळताच त्यांच्या खात्यावरुन 20 हजार रुपये परस्पर काढून घेतली.निगडी पोलीस याचा तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)