कारेगाव येथे भरदिवसा घरफोडी

रांजणगाव गणपती- कारेगाव (ता. शिरुर) येथील एका घरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी करून सुमारे साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. 24 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत किशोर शिवाजी कोहोकडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात एक लाख तीस हजार रुपयांची रोकड व एकतीस तोळे सोने असा आठ लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरी पळविला. भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)