कारेगावातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने हटविले

रांजणगाव गणपती- शिरूर तालुक्‍यातील कारेगाव येथील गावठाणातील अतिक्रमण गुरूवारी (दि.22) ग्रामपंचायत प्रशासनाने पाडली. यावेळी कारेगावचे सरपंच अनिल ऊर्फ किसन नवले, उपसरपंच नवनाथ नवले, ग्रामपंचायत सदस्य गणेश ताठे, तेजस फलके, रुपाली जगताप, दुर्गा नवले, मोनिका नवले, वर्षा नवले हे पदाधिकारी यावेळी हजर होते. सरकारी गायरान गट नंबर 385 मधील सुमारे 14 अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या सहकाऱ्याने पाडली. यावेळी तहसील रणजित भोसले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.के.शिंदे, मंडलाधिकारी टी.एस.गिरी गोसावी, कामगार तलाठी प्रशांत शेटे, ग्रामसेवक रमेश जासूद आदी उपस्थित होते. त्याचबरोबर या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)