कारागृहात बंद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

सातारा,दि.(प्रतिनिधी)

सातारा जिल्हा कारागृहातील एका बंद्याने सोमवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात कारागृह शिपाई जयवंत जाधव यांनी तक्रार दिली आहे. अभिजीत गोडसे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या बंद्यांचे नाव आहे.

अभिजीत याला फलटण पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून तो सातारा जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून बंदीवासात आहे. कारागृहात कैद्यांची संख्या वाढल्याने, काही कैद्यांना इतर कारागृहात हालवण्याची कार्यवाही सध्या जिल्हा कारागृह प्रशासनाकडून सुरू आहे.

त्याप्रमाणे गोडसे यालाही सोमवारी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात पाठवले जात होते. मात्र गोडसे याला ते मान्य नव्हते त्यामुळे त्याने कारागृहातील मूख्य गेटजवळ भिंतीवर डोके आपटुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)