कारागृहात कैद्याकडे सापडला मोबाईल

जिल्हा रुग्णालयातून आला मोबाईल
सातारा सातारा जिल्हा कारागृहात कैद्याकडे मोबाईल व दोन सिमकार्ड सापडली. शुक्रवारी सायंकाळी झडतीदरम्यान हा प्रकार समोर आला. अजमीर अकबर मुल्ला (रा.नागठाणे जि. सातारा) असे मोबाईल सापडलेल्या कैद्याचे नाव आहे. या घटनेने कारागृह व जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजमेर मुल्ला हा खंडणी व अपहरण सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयीत आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याने सातारा जिल्हा कारागृहात त्याचा मुक्काम आहे.मुल्ला याची प्रकृती बिघडल्याने त्याला काही दिवसापुर्वी सिव्हील हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल केले होते.

उपचरानंतर त्याला प्रिझनमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कारागृहात नेत असताना शुक्रवारी त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्यांकडे मोबाईल सापडला. या घटनेने कारागृहात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी पाहणी करुन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार कारागृहचे पोलिस कर्मचारी ललितकुमार पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हीलमधील प्रिझन वॉर्डबाहेरील पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा वाढवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)