कारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय !

पुणे: केंद्र शासनामार्फत महात्मा गांधी यांची 150 वी जयंती दि. 2 ऑक्‍टोंबर 2018 ते 2 ऑक्‍टोंबर 2019 या कालावधीत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाने कारागृहातील कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विशिष्ट वर्गात येणाऱ्या कैद्यांना माफी देण्यात येणार असून यासाठी शासनाने चार जणांची समिती नेमली आहे. केंद्र शासन महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार आहे.

महात्मा गांधी यांच्या मानवतावादी दृष्टीकोनातून कैद्यांची कारागृहातील वागणूक विचारात घेता विशिष्ट वर्गात येणाऱ्या कैद्यांना माफी देणयचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने कैद्यांचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. गृह विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दि. 2 ऑक्‍टोंबर 2018 ते दि. 6 एप्रिल 2019 आणि दि. 2 ऑक्‍टोंबर 2019 या तीन टप्प्यात कैद्यांना कारागृहातून मुक्‍त करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)