कारागृहातही संतोष पोळकडे पिस्तुल

सातारा जिल्ह्यात खळबळ

पिस्तुल बनावट असल्याचे कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण

कोल्हापूर – वाई येथील साखळी हत्याकांडातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ यांच्याकडे कळंबा कारागृहात मोबाईल व पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याच्याकडे सापडलेले पिस्तूल हे बनावट असल्याचे कारागृह प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.

-Ads-

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाई येथील साखळी हत्याकांडातील आरोपी डॉ. संतोष पोळ सध्या कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात आहे. त्याने कारागृहात मोबाईल घेऊन चित्रीकरण केले आणि हे चित्रीकरण व्हायरल केले. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

या चित्रीकरणात तो खूप कागद पत्रे घेऊन बसला आहे अशी दृश्‍ये आहेत. कंळबा कारागृहातील काही महत्त्वाच्या आरोपीपैकी डॉक्‍टर पोळ हा एक आहे. त्याच्याकडेच अशा प्रकारे मोबाईल सापडल्यामुळे कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)