कारसह दिड लाखांचा खुटका जप्त

लोणी काळभोर- रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने तपासणी केलेल्या एका स्वीफ्ट कारमध्ये कर्नाटक राज्यातून आणलेला दिड लाख रूपयांचा गुटखा मिळून आला असून कारसह गुटखा असा एकूण 8 लाख 25 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकावर अन्न सुरक्षा मानदेह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, याप्रकरणी सुरेश मिलापजी ओसवाल (वय 40, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. सी. थोरबोले, पोलीस हवालदार शंकर साळुंखे व आर. एल. राऊत हे रात्रगस्त करीत असताना शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे गेले होते. ते घाटाच्यावर थांबले असताना मध्यरात्री दीडच्य सुमारास जेजूरी बाजूकडून स्वीफ्ट कार (एमएच 12 एनए 9523) ही गाडी आली. समोर पोलीस पाहतांच वाहनचालक घाबरल्याने पोलिसांना संशय आलेने त्यांनी गाडी थांबवून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता डिकीमध्ये काही पोती आढळून आली. त्यामध्ये गुटखा भरलेला होता. म्हणून त्यास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर आज (सोमवारी) सकाळी ही बाब अन्न व औषध प्रशासनास कळवण्यात आली. अन्न व सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे व देवानंद विर यांनी मालाची पाहणी करून पंचनामा केला असता त्यांना 1 लाख 20 हजार रूपये किमतीचे 120 ग्रॅंम वजनाची विमल पान मसालाची एक हजार पॅकेट व 30 हजार रूपये किमतीचे 16 ग्रॅम वजनाची व्ही-वन तंबाखूची एक हजार पॅकेट असल्याचे निदर्शनात आले.
कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व सुरक्षा आयुक्त मुंबई यांनी मानवी शरीरांस घातक असलेले गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थाची विक्री, साठा व वहातूक करण्यास महाराष्ट्र राज्यांत बंदी घातली आहे. सुरेश ओसवालने हा माल निपाणी (जि. बेळगाव, कर्नाटक राज्य) येथून खरेदी करून आणल्याची कबुली दिली आहे. स्वीफ्ट कारचा प्रतिबंधीत अन्नपदार्थाच्या वाहतुकीसाठी पुनर्वापर होवू नये म्हणून ते जप्त करण्यात आले आहे.

  • सुरेश ओसवालवर यापुर्वीही दोनवेळा अशीच कारवाई
    सुरेश ओसवालवर यापुर्वीही दोन वेळा अशीच कारवाई झाली होती. दोन्ही वेळेंस मोठ्या प्रमाणांत गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार तो हवेली तालुक्‍यातील सर्व गुटखाविक्रेत्यांना मालाचा पुरवठा करत आहे. त्यामुळेच लोणी काळभोर, उरूळी कांचनसह सर्व मोठ्या गावांतून पान व किराणा दुकानांतून गुटखा खुलेआम विकला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तर पूर्व हवेलीतील एका गावात असलेल्या गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून सर्वत्र वितरीत करण्यात येत असल्याच्या चर्चेने परिसरात जोर धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)