कारवाई गुंडाळताच स्वारगेट “जैसे थे’

चौकाची कोंडी : “नो पार्किंग’, “नो हॉल्टिंग’मध्येच रिक्षांच्या रांगा

पुणे – रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली वाहने, जागा मिळेल तिथे पार्किंग, यातूनही शिल्लक जागेवर प्रवासी घेण्यासाठी कोठेही थांबलेल्या रिक्षा यामुळे अडखळलेली पीएमपी बस यामुळे स्वारगेट चौक पुन्हा कोंडीत सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी केलेली कारवाई प्रशासनाने आता गुंडाळल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

-Ads-

दोन महिन्यांपूर्वीच महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मिळूून चौकातील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने रिक्षाचालक थेट “नो पार्किंग’, “नो हॉल्टिंग झोन’ मध्ये रिक्षांच्या रांगा लावत आहेत.
स्वारगेट हा शहरातील प्रमुख चौक असून सुरळीत वाहतुकीसाठी येथील परिस्थिती नियंत्रणात असणे आवश्‍यक आहे. याच चौकात राज्य परिवहन (एसटी) महामंडळा स्थानक, दुसऱ्या बाजूला पीएमपी स्थानक आणि स्थानिक रिक्षा यामुळे रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर पीएमपीचे स्थानक आहे. येथे प्रवासी घेण्यासाठी होणारी खासगी वाहनांची गर्दी लक्षात घेता “नो हॉल्टिंग’ झोन तयार करण्यात आला आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याने एकापाठोपाठ जवळपास पंधरा ते वीस रिक्षा उभ्या असलेल्या दिसून आल्या. यामुळे पीएमपीबरोबरच इतर वाहनांना ये-जा करताना अडचण येत असून वारंवार कोंडी होत असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले.

स्वारगेट आगारात प्रवेश करण्यासाठी असलेल्या जागेशेजारी हे पीएमपी स्थानक आहे. त्यामुळे एसटी स्थानकातून येणारे प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालक आणि पीएमपीचे वाट पाहणारे प्रवासी यामुळे या परिसरात कोंडी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बेशिस्तपणे ऑटोरिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे.

“नो पार्किंग’, “नो हॉल्टिंग झोन’मध्ये उभ्या राहणाऱ्या रिक्षा तसेच इतर वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येते. शिस्त न पाळणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई केली जाईल.
– पी. एन. ढगे, पोलीस निरीक्षक, स्वारगेट विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)