कारवाईत पालिकेकडून 26 हातगाड्या जप्त

पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 26 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पिंपळे गुरव परिसरातील सृष्टी चौक, साठ फुटी रस्ता, रामकृष्ण चौक, काटेपुरम चौक, डायनासोर उद्यान येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. महापालिकेच्या अनधिकृत व अतिक्रमण नियंत्रण विभागाने या अतिक्रमणावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 26 हातगाड्या, एक लोखंडी टेबल जप्त करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहशहर अभियंता यांच्या अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे पाच कार्यालयीन अधीक्षक, नऊ मुख्य लिपिक, महापालिकेचे 50 मजूर, एक क्रेन, एक जेसीबी, चार डंपरच्या सहाय्याने ही कारवाई पुर्ण करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)