कारवाईच्या दिरंगाईने जगतापांसह नगरसेवकांची उडाली झोप

राष्ट्रवादीच्या परिवर्तन रॅलीमुळे कारवाई पुढे ढकलली

नगर – भारतीय जनता पक्षाला महापौर व उपमहापौर निवडणुकीत बाहेरून पाठिंबा देण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांवर प्रदेश कार्यालयातून कारवाईची टांगती तलवार आहे. आठवड्याभरापासून ही कारवाई होणार असे सांगितले जात आहे. परंतु ती कधी होणार, हेच नेमके कळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची झोप उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसात कारवाई होईल, असे ठामपणे सांगत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय जनता पक्षाच्या महापौर व उपमहापौरांनी महापालिकेत कारभार सुरू करून 12 दिवस लोटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीने कॉंग्रेसने भाजपला विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे.

भाजप व राष्ट्रवादीच्या अजब युतीवर राज्यासह देशात पडसाद उमटले आहेत. स्थानिक राजकीय थंडीच्या वातावरणात देखील तापलेले आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या युतीवर नाराज आहे. पक्षाध्यक्षांनी अप्रत्यक्षरित्या नकार देऊन देखील स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीच्या 18 नगसेवकांनी भाजपला सत्तेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर प्रदेश कार्यकारिणीकडून कारवाई प्रस्तावित होत आहे.

प्रदेश कार्यकारिणीने नगरसेवकांना नोटीसा बजावून खुलासा मागविले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या नोटिसांना एकत्रपणे उत्तर दिले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या खुलाशानंतरही कारवाईचे संकेत दिले आहे. आजच कारवाई होणार होती. परंतु रायगड येथून राष्ट्रवादीचे परिवर्तन रॅली सुरू होणार असल्याने कारवाई झाली नाही. कारवाई दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आठवड्यापासून कारवाईबाबत चालढकल होत असल्याने आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांचा झोपा उडाल्या आहेत.

शहराध्यक्षपदासाठी चाचपणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते हे आमदार अरुण जगताप यांच्या निष्ठावान आहे. शहराध्यक्षपदाची त्यांना लागोपाठ दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. विधाते यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे संकेत प्रदेशकडून मिळत आहे. त्यानुसार प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांनी विधाते यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्नही मध्यतंरी केला आहे. केडगावचे अंबादास गारुडकर यांचे नाव पुढे आले होते. परंतु गारुडकर यांनी नकार दिल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)