कारला धडक देणाऱ्या डंपरच्या चालकाला 3 महिने तुरूंगवास

पुणे, दि. 27 – बेदरकपणे वाहन चालवत चारचाकीला धडक देणाऱ्या डंपर चालकाला तीन महिने तुरूंगवास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास अतिरीक्त 20 दिवस कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नजीर अब्दुल नायकवाडी (वय 24, रा. मांगडेवाडी, कात्रज) अशे शिक्षा देण्यात आलेल्या डंपर चालकांचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण गोपाजी नरवडे (वय 50, रा. गंगाधान फेज 1, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली होती. नरवडे हे त्यांची होंडा सिटी कार घेवून 9 जून 2016 रोजी नऱ्हे येथील झील कॉलेज समोरून निघाले होते. रात्री साडेअकरा वाजता ते कात्रज बायपास रस्त्यावर दत्तनगर ओव्हर ब्रीज पासकरून दोन वाहनांच्या मागे थांबले होते. तेवढ्यात नायकवाडी यांच्या डंबरने नरवडे यांच्या कारला मागच्या बाजूने जोरात धडक दिली. सुर्दैवाने त्यात कोणतीही जीवीत हानी झाली नव्हती. मात्र नरवडे यांच्या गाडीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते, असे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यानुसार नायकडवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी पाहिले. त्यांनी 5 साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजत पोलीस नाईक एस. एस. फरांदे यांनी मदत केली. तर पैरवी अधिकारी म्हणून रणजीत गट यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)