कारण, ‘ती’ एक आई आहे…परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल

काबूल : आपल्या बाळासाठी एखादी आई काय करू शकते, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यात आणखी एक प्रसंग जोडला गेला आहे. बाळाला पोटाशी धरून परीक्षा देणाऱ्या एका महिलेचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, बाळाची काळजी घेत ही महिला परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

अफगाणिस्तानातील निली शहरात विद्यापीठात आपल्या बाळास सोबत घेऊन या महिलेने परीक्षा दिली. याचा फोटो विद्यापीठातील एका प्राध्यापकाने पोस्ट केला आहे. जहां ताब असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान परीक्षा देताना बाळाने रडणे सुरू केले. त्यावेळी तिने जमिनीवर बसून परीक्षा दिली. जगभरातून या मातृत्वाला सलाम केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)