कारण जोहरच्या ‘धडक’मध्येही ‘झिंगाट’ची जादू

मुंबई : ”सैराट’चा अधिकृत रिमेक असलेल्या करण जोहरच्या आगामी ‘धडक’ चित्रपटात ‘झिंग झिंग झिंगाट’चं हिंदी व्हर्जन दिसणार आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ‘धडक’मधील या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे झिंगाटचे नवे रुपडे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
अजय-अतुल यांनी सैराटमधील गाण्यांना संगीत दिले होते. यापूर्वी अजय-अतुलच्या ‘कोंबडी’च्या चालीवर ‘चिकनी चमेली’ हे गाणं हिंदीत गाजले आहे. त्यामुळे ‘झिंगाट’चे हिंदी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. धडक 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)