कारच्या धडकेने इसमाचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संजू पंचमुख (वय-45, रा. गणेशनगर पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून मुकेश कविदास जोगदंड, (वय-26, रा.अण्णासाहेब नगर, चिंचवड ) असे कारचालक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार 12 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मेव्हणा विशाल अजिनाथ ऊल्लारी, (वय-35, रा.गणेशनगर, पिंपरी) महावीर चौक, चिंचवड येथून पायी जात होते. आरोपी जोगदंड याच रस्त्यावर भरधाव वेगाने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन कार चालवत होता. आरोपीच्या कारची जोरदार धडक बसल्याने पायी निघालेले ऊल्लारी गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान मंगळवारी (दि.24) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बोचरे पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)