कारच्या धडकेत पत्नी ठार, पती गंभीर

उंब्रज दि. 29 (प्रतिनिधी) – पुणे – कोल्हापूर मार्गावरील पेरले ता. कराड गावचे हद्दीत दुचाकी व चारचाकीच्या धडकेत एक महिला ठार झाली असून तिचा पती गंभीररित्या जखमी झाला आहे. शनिवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शालन संभाजी कुंभार (वय 55) रा. सवादे ता. कराड असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून तिचे पती संभाजी भाऊ कुंभार (वय 60) रा. सवादे हे गंभीररित्या जखमी झाले आह्रेत. हे दांपत्य वर्षश्राद्ध कार्यक्रमावरून घरी परतताना महामार्गावरील पांचाली हॉटेल समोर हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डस्टर कारने (एम. एच. 46 ए. पी. 3157) या दाम्पत्याच्या दुचाकीला (एम. एच. 50 इ 6774) जोराची धडक दिली. यामध्ये शालन कुंभार जागीच ठार झाल्या.
अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, किणी टोलनाक्‍यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतिक किशोर हरगुळी रा. अंधेरी (मुंबई) असे आरोपीचे नाव असून उंब्रज पोलीसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)