कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पिंपरी – दुचाकीवरुन हॉटेलमध्ये जेवायला निघालेल्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या कारचालकाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) रात्री दीडच्या सुमारास हॉटेल वुड्‌स समोर भुगांव रोड येथे घडली.

कुणाल शर्मा (वय 18, रा.विमाननगर, पुणे) आणि मानस उपाध्याय (वय 18, रा.न्याती एम्पायर खराडी,पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. अमरनाथसिंग राजेशसिंग (वय 18, रा.खराडी, मुंढवा) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दर्शन विजय जमदाडे (वय 25, रा. बावधन) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

फिर्यादी अमरनाथसिंग हे काल (दि. 23) उशीरा रात्री दीडच्या सुमारास आपले मित्र ध्रुव बिष्णोई, मानस उपाध्याय, शुभम मदार व कुणाल शर्मा यांच्या समवेत भुगाव ता. मुळशी येथील हॉटेल कॅफ सीओ-2 येथे जेवायला चालले होते. यावेळी दर्शन जमदाडेच्या कारने अचानक ध्रुव बिष्णोई व मानस उपाध्याय ज्या दुकाचीवरुन चालले होते त्याला जोरदार धडक दिली. तसेच शुभम मदार व कुणाल शर्मा यांच्या दुचाकीला सुध्दा जोरदार धडक दिली. या धडकेत मानस उपाध्याय आणि कुणाल शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)