कारच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात

आळेफाटा – स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी 3:00च्या सुमारास अहमदनगर-कल्याण महामार्गावर राजुरी गावाजवळ घडली. बाळकृष्ण दादाभाऊ मोढवे (वय 50, रा. निमगाव भोगी, ता.शिरूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार संदीप फड यांनी माहिती दिली की, मयत बाळकृष्ण मोढवे हे दुचाकीवरून (क्र. एमएच12 ईएस 9665) अहमदनगरच्या दिशेने जाताना समोरून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच 43 डी 7631) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये बाळकृष्ण मोढवे गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. अनिल सुदाम मोढवे (वय 33, रा. निमगाव भोगी) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मारूती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सतिश घाडगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)