कारच्या धडकेत चौघे गंभीर जखमी

गौरीशंकरजवळ अपघात; रस्ता दुभाजकावर बसलेल्या युवतींना धडक

सातारा – लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत गौरीशंकर महाविद्यालयासमोर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण चौघे गंभीर जखमी झाले. जखमीमध्ये गौरीशंकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यानींसह दुचाकीवरून निघालेल्या दोघांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सायली इथापे (रा.चिंधवली, ता. वाई), प्राजक्ता जगताप (रा. शेंदुरजणे, ता. वाई) या महाविद्यालीन युवतींसह उत्तम महादेव लव्हळे (रा. संभाजीनगर), सतीश किसन यादव (रा. लाडेगाव, ता. खटाव) हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या (एमएच 11 बीएच 3432) या स्विफ्ट कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यावेळी महामार्गावरून निघालेल्या (एमएच 11 बीएच 7053) या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महामार्गावरच फरफटत गेले. धडक बसल्यानंतरही कार चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही.

दरम्यान, वाईला जाणाऱ्या बसची वाट पाहत रस्ता दुभाजकावर बसलेल्या दोन युवतींच्या अंगावर कार गेली. त्यामुळे त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. जखमींना तेथीलच एका रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघातातील जखमी सतीश यादव व प्राजक्ता यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील चालकाचे नाव राजेंद्र घाडगे (रा. शाहूपुरी) असे असल्याची माहीती जिल्हा रुग्णालयातील पोलिस सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)