कारगील मॅरेथॉनमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार

भोसरी – मेटल फिनिशर्स असोसिएशनच्या वतीने कारगिल मॅरेथॉनमध्ये विशेष कामगिरी केलेल्या 15 स्पर्धक उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी दुहेरी आयर्नमॅन किताब विजेते दशरथ जाधव, रनिंग ग्रुपचे संस्थापक एन. डी. गवारे, मेटल फिनिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बनवट, सचिव अविनाश दोशी, उपाध्यक्ष श्रीनिवास राठी, खजिनदार तथा रन फॉर सरहदचे आयोजक संजीव शहा, सह सचिव सचिन बापतीवाले आदी उपस्थित होते. दशरथ जाधव म्हणाले की, आयुष्यात दवाखान्यापासून दूर राहायचे तर धावले पाहिजे. धावणे हा सोपा व सहज करता येणारा व्यायाम आहे. निरोगी आरोग्य जगायचे असेल तर चालले किंवा धावले पाहिजे. शहा म्हणाले, कारगिलच्या तरुणांमध्ये देशप्रेम जागरूक करणे आणि त्यांना प्रवाहात आणणे यासाठी सरहद संस्था कार्यरत आहे. तेथील पर्यटनाला चालना मिळावी. तरुणांना शिकवून सक्षम करणे यासाठी सरहद कारगिलच्या 39 तर जम्मू काश्‍मीरच्या 150 मुलांना शिक्षण देत आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मुख्य समन्वयक संजीव शहा यांनी सांगितले. यावेळी सहभागी झालेल्या स्पर्धकांनी कारगिल मधील धावण्याचा आपला अनुभव सांगितला.सूत्रसंचालन मिलिंद वराडकर यांनी केले. तर आभार अविनाश दोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)