कारगावचे माजी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा

रांजणगाव गणपती-कारेगाव (ता. येथील) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत कराचा अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक विजयकुमार सोनवणे आणि सरपंच वनिता विश्वास कोहकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पंचायत समितीचे अधिकारी अशोक बांगर यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
या संदर्भात रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तत्कालीन सरपंच वनिता विश्वास कोहोकडे व ग्रामसेवक विजयकुमार आबासाहेब सोनवणे यांनी संगनमताने शिरुर येथील कॅनरा बॅंकेत खाते उघडून 25 ऑक्‍टोबर 2011 ते 19 मे 2015 या कालावधीत 1 कोटी 61 लाख बाविस हजार आठशे सतरा रुपयांचा ग्रामपंचायत कार्यालयात अपहार केला आहे. या बाबत विद्यमान सरपंच अनिल ऊर्फ किसन नवले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.
25 ऑक्‍टोबर 2011 रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेत विषय क्रंमाक 11 च्या ठराव क्रमांक 27/4 या बनावट ठरावाद्वारे कॅनरा बॅंकेत 2582101007826 हे खाते खोलण्यात आले व कारेगाव हद्दीतील कंपन्यांनी करापोटी दिलेले धनादेश या कॅनरा बॅंकेतील खात्यावर जमा करुन हे पैसे स्वतःसाठी वापरले असल्यामुळे व आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे या आरोपींवर भा.द.वि. कलम 34,406,408,409, 420, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे रांजणगाव पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)