कारखेलचे नागरिक रोडरोमिओंवरोधात आक्रमक

सोमेश्‍वरनगर- कारखेल (ता. बारामती) परिसरात गेल्या काहि दिवसांपासून रोडरोमिओंनी धुमाकुळ घातला असून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे संतप्त झालेले नागरिकांनी आज (सोमवारी) गावातून मुक मोर्चा काढून गाव बंद ठेवले तर येथील न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेला सुट्टी देण्यास भाग पाडल्याने गावत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कारखेल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी कारखेलसह आजुबाजुच्या गावातून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींची छेड हे रोडरोमिओं काढीत असून त्यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच पोलिसांची भानगड नको म्हणून अनेक पालक या गोष्टींकडे दुर्लक्षकरून मुलींना एक दिवस शाळेत जावू नकोस असा सल्ला देत प्रकरणावर पडदा टाकत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील काही रोडरोमिओंनी एका मुलीची छेड काढली होती, त्यामुळे संतप्त झालेल्या पीडिताने व तिच्या पालकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन मुलांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला खर; परंतु आरोपींना अटक केली नव्हती. यामुळे चिडलेले ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी गावातून मूक मोर्चा काढीत गावातील दुकाने बंद केली. तसेच प्राथमिक शाळा व विद्यालय बंद ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर मूक मोर्चा न्यू इंग्लिश स्कूलमधे नेला व पोलीस येईपर्यंत शाळेच्या समोरील मैदानात ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून गावतील पोलीस पाटलांनी पोलिसांना घटनास्थळावर पाचारण केले. काही वेळातचं वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजाराम साळुंके हे घटनास्थळी आले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करीत परिस्थिती योग्यरितीने हातळ्याने तणाव निवळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

  • विनयभंग केलेल्या आरोपीना तातडीने अटक करुत तसेच मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कडक कारवाईकरण्यात येईल. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे.
    – राजाराम साळुंके, उपनिरीक्षक, वडगाव निंबाळकर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)