कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठीच मी रिंगणात

म्हसवड : प्रचार दौऱ्याप्रसंगी आयोजित बैठकीत बोलताना रणजिसिंह मोहिते-पाटील.

रणजितसिंह मोहिते-पाटील : माण तालुक्‍यात प्रचार दौरा

म्हसवड, दि. 22 (प्रतिनिधी) – शेतकरी सभासदांच्या मालकीचा शंकर साखर कारखाना विक्रीसाठी निघाल असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासमवेत काम केलेल्याच्या कुटुंबातील व्यक्तींना बरोबर घेऊन खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलो असल्याचे मत माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
श्री शंकर सह साखर कारखान्याच्या निवडणुक प्रचार सभेत ते बोलत होते. माण तालुक्‍यातील म्हसवड, बिदाल, राणंद, मार्डी, दहिवडी, गोंदवले बु., गोंदवले खुर्द, नरवणे, लोधवडे, जाशी, वरकुटे-म्हसवड, देवापूर येथे सभासदांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला.
रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, हा कारखाना बंद पडल्याने सभासद, तोडणी कामगार, वाहन मालक, कामगार तसेच अनेक लहान-मोठे मोठे व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील बाजारपेठेवरही यांचा परिणाम जाणवत आहे. सभासदांनी केवळ निवडून दिले म्हणजे काम संपले असे समजून चालणार नाही. संचालक मंडळाबरोबर राहून आपण सर्वांनी मिळून हा कारखाना पूर्व स्थितीत आणावयाचा असल्याचे मोहिते-पाटील म्हणाले.
माणमधील सभासदांनी राणंदमध्ये त्यांचे जंगी स्वागत करून सहकार्य करण्याचे वचन दिले. या दौऱ्यादरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, श्रीराम पाटील, सुर्याजीराव जगदाळे, अनिल पाटील, गोविंदराव शिंदे, बाळासाहेब सावंत, प्रताप भोसले, भरतेशशेठ गांधी, माजी संचालक विलासराव माने, रामभाऊ पोळ पाटील, सुदामशेठ जाधव, शिवाजीराव जगदाळे, मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन दादासाहेब जाधव, तानाजी मगर, अंगराज कट्टे, सयाजी पाटील, बाळासाहेब पाटील, लालासाहेब पवार, जोतिराम काटकर, सह सर्व उमेदवार व सभासद उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)