कारंजे तुटले, खेळणी फुटली …

समस्यांचे उद्यान भाग 1
————–

पिंपरी – संत तुकारामनगर येथील कै. बी. डी किल्लेदार उद्यानात सर्वत्र समस्याच समस्या दिसत आहेत. मात्र सोयीसुविधा अभावी उद्यान भकास झाले आहे. उद्यानातील झाडे पाण्यावाचून कोमेजली असून ठेकेदाराच्या निष्क्रीय कारभारामुळे उद्यानाची रया गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महापालिकेने कै. बी. डी किल्लेदार उद्यान विकसित केले आहे. लहान मुलांची खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांची फेरफटका मारण्यासाठी या उद्यानात गर्दी असते. पाणी आणि स्वच्छतेच्या कामासाठी याठिकाणी दोन कर्मचारी आहेत. मात्र, उद्यान परिसरात कायम कचरा आढळून येतो. उद्यानातील बाकडे स्वच्छतेअभावी बसण्यायोग्य नाहीत. उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने क्षणभर हिरवळीत जावून बसावे असे सर्वांनाच वाटते यासाठी नागरिक उद्यानाकडे येतात. मात्र झाडे कोमेजून गेल्याने उद्यान रुक्ष दिसत आहे. पाणी असून सुद्धा झाडांना पाणी देण्यात हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.

उद्यानातील लहान मुलांची खेळणी तुटली आहेत. लहान मुलांचा आवडीचा खेळ डकचक्री तुटली असून रोप वे देखील पुर्ण तुटून गेला आहे. त्यामुळे मुले तुटके-फुटके खेळणे खेळत असून त्यांना इजा पोहचत आहेत. खेळणी फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठी असताना मोठी मुले देखील मुजोरी करुन खेळत असल्याने लहान मुलांना खेळायला मिळत नाही, असे पालकांनी सांगितले. तसेच उद्यानात पदपथावरील फरशा निखळल्याने नागरिकांना ठेचकळावे लागत आहे. एका महिन्यापूर्वी एका महिलेला फरशीची जोरदार ठेच लागून पायाला गंभीर इजा झाली होती. झाडांची वेळेवेळी छाटणी होत नसल्याने झाडे वेडीवाकडी वाढली आहेत. तसेच उद्यानातील कारंजे मागील एका वर्षापासून बंद आहे. उद्यानातील तलावाला गटाराचे स्वरुप आले आहे. मात्र तरी ठेकेदाराला व उद्यान विभागाला जाग कधी येणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

उद्यानातील प्रमुख समस्या
– नियमित स्वच्छता होत नाही
– लहान मुलांची खेळणी तुटली
– पाण्यावाचून झाडे कोमेजली
– उद्यानातील कारंजे बंदच
– पदपथावरील फरशा निखळल्या
– झाडांची छाटणी होत नाही
– उद्यानातील तलाव अस्वच्छ

आम्ही रोज उद्यानात येतो मात्र येथे कसल्याच सुविधा पुरवल्या जात नाही. बसायला टेबल स्वच्छ नाहीत तसेच पदपथावरील फरशा निखळल्याने ठेच लागून नागरीक जखमी होत आहे. प्राधान्याने फरशांची दुरुस्ती करायला हवी. स्वच्छता वेळोवेळी व्हायला हवी. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यायला हवे. उद्यानात प्लास्टिक तसेच कचरा टाकण्यास मनाई करावी. कमळाचा तलाव अत्यंत अस्वच्छ आहे.
– ज्योती दुबे, नागरीक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)