काय सांगू देवा… ज्ञानेबाची ख्याती’ने दिवाळी पहाटची सांगता

आळंदी- दीपावलीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे वसुबारस ते भाऊबीज (4 ते 9 नोव्हेंबर) माउली मंदिरात दररोज पहाटे 6 ते 8 आणि 8 ते 10 या वेळेत पहाट, स्वराभिषेक संगीत भजन सेवेचे आयोजन हे देवस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
आज (दि. 9) भाऊबीजेच्या दिनी सुमधुर, नामांकित गायक, तबला वादक आणि साथ संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमात सांगता समारंभाच्या उत्तरार्धात अवघ्या 13 वर्षाचा बालगायक सिध्देश अशोक पांढरे याने आजच्या संगीत,भजन गायन कार्यक्रमात काय सांगू देवा… माझ्या ज्ञानोबाची ख्याती…, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जय जय रामकृष्ण हरी… या व अशा अनेक एकापेक्षा एक भावगीते, भक्तीगीते आपल्या सुमधुर आवाजात गाऊन उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांची पारणे फेडली. त्यास पखवाज साथ अविनाश महाराज पवार, तबला साथ ही श्रीकांत पांढरे चंद्राशु अवधूत चक्रांकित व निशांत भरते यांनी दिली.
देवस्थांच्या वतीने प्रमुख व्यवस्थापक माउली वीर यांनी सिध्देश पांढरेसह गायक, वादक व साथ संगीतकार आदींचा शाल, श्रीफळ आणि माउलींची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित असा सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक पांढरे (सपत्निक), भगवान लेंडघर, महादेव पाखरे, नंदकुमार गोडसे, गणेश नकाते, राजू किराड, नंदा पवार आणि शकुंतला जाधव आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)