काय रे गिरीश?, अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही, पुणेकराची बॅनरबाजी 

पुणे – पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट गडद असतानाच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरु झाली आहे. काय रे गिरीष?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही, अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. हा बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही.

पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास जरी टळले असले तरीही पाणीकपात निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे बॅनर शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहेत. यावर, काय रे गिरीष?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतंय ? असे प्रश्न विचारण्यात आले असून बॅनरखाली एक त्रस्त पुणेकर लिहिण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जलसंपदा विभाग कपातीसाठी आग्रही असल्याने, या विषयावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महापौर बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली आहे.

दरम्यान, बॅनरबाजी ही पुणेकरांना काही नवीन राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी शिवडे, आय अॅम सॉरी तसेच दादा मी प्रेग्नेंट आहे, सारखे बॅनर झळकले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)