काय म्हणाले शरद पवार भाजप शिवसेना युतीवर ?

मुंबई: शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेनं अनेकदा सत्तेत असूनही भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल ? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

शरद पवार म्हणाले, शिवसेनेना आणि भाजपची युती होईल, मात्र ती युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होईल. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत, असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)