काय आहे सॅलड हा प्रकार?

खरं तर हा नवीन वाटणारा पदार्थ अतिशय जुना आहे आणि आपल्या सर्वांचा ओळखीचा आणि आवडीचा आहे. अहो आपली कोशिंबीर! हो तेच ते सलाड ! हो, अगदी बरोबर ओळखलं. अगदी आपल्या नैवेद्याच्या ताटात असते न काकडीची कोशिंबीर प्रत्येक सणाला तो काकडीच्या सलाडचा एक प्रकार. म्हणजे हे सलाड आपण पूर्वी पासून खात आलो आहोत. मग आताच का त्याची इतकी चर्चा करतोय हल्ली. तर आपण आधी हे सलाड आता इतका का महत्वाचा आहे याचा आढावा घेऊ. नुसते खाल्ले पाहिजे असं सांगून उपयोग नाही. ते का गरजेचं आहे ते सांगितलं आपोआप आवडेल खायला सर्वांना.

तर पूर्वी होती ती दिनचर्या आता आपली कोणाचीच राहिली नाही. न स्त्रियांची न पुरुषांची. हल्ली आपले शारीरिक ताणताणाव म्हणजे उदाहरणार्थ आपला आपल्या ऑफिस परियंत चा प्रवास यात होणारी धावपळ आणि मानसिक ओढाताण या पासून ते आपल्या ऑफिस मधील आपल्या समोरची टार्गेट्‌स आणि त्यांनी येणारा मानसिक तणाव या परियंत. हे सगळ आता स्त्री पुरुष सर्वाना करावं लागतंय. पूर्वी शरीर धाटणी हिच होती. आताहि तीच आहे. पण भोवतालची परिस्थिती, दिनचर्या, आणि खाणे पिणे हे मात्र बदलत गेलंय. आता हा बदल त्याच शरीर धाटणीला पेलवत नाहीत, झेपत नाही आणि त्रास सुरु होतात, आणि ते काही रोगांच्या स्वरुपात दिसू लागले आहेत. याची उदाहरणे म्हणजे मूळव्याध, बद्ध कोष्ठता हे बहूतकरून अनेकांना होणारे त्रास.

म्हणून आता आपण या शारीरिक त्रासांना सामोरे जाताना आपल्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांचे प्रमाण बदलायला हरकत नाही. म्हणून 1 चमचा कोशिंबिरी ऐवजी आता वाटीभर सलाड खायला हवे. याचा फायदा असा होतो कि आपण तंतुमय पदार्थ खाऊ लागतो ज्यांनी आपल्या पोटाला चांगला उपयोग होतो. दुसरी गोष्ट आपण जी भाजी खातो शिजवून त्यातील जवळ जवळ सर्व विटामिन शिजताना निघून जातात, तेच हि सलाड कच्ची असल्या कारणाने ती सर्व विटामिन आपल्याला मिळतात. वरून फोडणी ऐवजी दही किवा लिंबू घातले तर क जीवनसत्व देखील मिळते. मधुमेह, बिपी असणार्या लोकांनी आवर्जून खावीत.

हल्ली सलाड देखील इटलियन, मक्‍सिकॅन अशी असतात. आपल्या नव्या पिढीला आवडतात. त्यात भाज्या जास्त आहेत आणि चीज वगैरे चे प्रमाण काही आहे न असे पाहून हे प्रकार देखील खाऊन पाहायला हरकत नाही. पिझ्झा आणि मैदा प्रकार कायम खाणार्या आपल्या युवा पिढीला हि सलाड खायला हरकत नाही. कारण सतत पिझ्झा ब्रेड खाणार्या या मंडळीना पोटा संदर्भात लवकर तक्रारी सुरु होऊ शकतील.

मधुमेह, बिपी, मुळव्याध, थायरॉईड हे रोग खूप कमी वयात आले आहेतच. तर मग आपण जेवणात हे सलाड घेत जाऊ. विविध प्रकार याचे करता येतील. गाजर, काकडी कांदा टोमाटो सलाड ची पाने, कोबी, आणि बर्याच भाज्या कच्चे मुग आणि लिंबू वापरून हा पदार्थ आपल्या आवडीनुसार बनवून पहा नी कसं वाटतय नक्की कळवा.

श्रुती देशपांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)