काय आहे वास्तव? 

“आर्य भारतात आलेच नव्हते!’ अर्थात आर्यांचे आक्रमण झाल्याच्या गृहितकास खोटे ठरविणारे संशोधन उजेडात- हे वृत्त वाचून सर्व देशाभिमानी लोकांस आनंद झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे व त्यांचे सहकारी या सर्वांचे अभिनंदन! म्हणजे येथे कोठे सिंधू संस्कृती होती व आक्रमक आर्यांनी ती संपवून आपले वर्चस्व स्थापन केले, अशा तऱ्हेची कपटी ब्रिटिशांनी त्यांच्या “फोडा व झोडा’ नीतीस अनुसरून पसरवलेली धादांत असत्ये यामुळे मोडीत निघाली, या अगोदर डेव्हिड फ्रॉलीने The myth about Aryan invasion in India या पुस्तकाद्वारे असल्या शक्‍यता फेटाळून लावल्या होत्या. स्वामी विवेकानंदांनीही अशा शक्‍यतेचे खंडन केले होते. “सिंधु’चा अपभ्रंश हिंदू हा शब्द आला याचीही शक्‍यता आपोआपच मावळते.

यातून मूल ज्ञानस्त्रोत असणाऱ्या वेदांची (वेद-ज्ञान) उत्पत्तीही भारतभूमीच होय. हे आपोआप उघड होते. मात्र, हे ईश्‍वरीय ज्ञान असल्याने सर्व विश्‍वमानवांचा त्यावर अधिकार आहे, म्हणून वेद संस्कृतीतील यज्ञप्रथा विश्‍वभर असल्याचे आढळते. वरील संशोधनानंतरही काही तथाकथित विद्वान कासावीस होऊन वेदधर्म दुरून येथे आला व असली विधाने करू लागले आहेत. वेदांनुसार “आर्य’ हा शब्द सुसंस्कृत (cultured) अशा अर्थाने आला आहे. ज्याचे बोलणे, चालणे, वागणे सुसंस्कारित तो आर्य असे म्हणलेले आहे. तेव्हा जाती-जमाती अस्तित्वातच नसल्याने आर्य शब्दाचा संबंध जाती धर्माशी लावणे निखालस चूक आहे!!
– श्‍यामसुंदर गंधे, पुणे 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)