कायली जेनर सर्वात कमी वयात बनली अब्जाधीश

नवी दिल्ली : अमेरिकेतील कायली जेनर सर्वात कमी वयात अब्जाधीश ठरली आहे. कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केले आहे. फोर्ब्स’ने अमेरिकेतील ‘सेल्फ मेड बिलेनिअर’ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे.

‘कायली कॉस्मेटिक्स’ नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक आहे. ही कंपनी महिलांसाठीचे सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू तयार करते. दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती. अवघ्या दोनन वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे. कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली आहे.

फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात आहे. कायलीची कंपनी ‘कायली कॉस्मेटिक्स’ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास आहे. येणाऱ्या काळात कायलीचा व्यवसाय आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कायलीची तिच्या कंपनीत 100 टक्के भागिदारी आहे. कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती. या किटचा उपयोग लिपस्टिक आणि लिप लायनर यांना मॅच करण्यासाठी केला जातो.

फोर्ब्सच्या यादीत कायलीला अमेरिकेतील सर्वात कमी वयाची अब्जाधीश ठरली आहे. कायलीने ट्वीट करत फोर्ब्सचे आभार मानले आहे. कायलीने ट्वीटमध्ये म्हटले की, ‘धन्यवाद फोर्ब्स. मी नशीबवान आहे, मला जे आवडते ते काम मी दररोज करते.’ कायली मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे. अर्थात किमची बहिण असल्यानं ती प्रसिद्ध होतीच मात्र या कंपनीनं तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)