कायली जेनरला हवे ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष गिफ्ट

हॉलिवूड स्टार कायली जेनर नेहमी आपल्या हॉट फोटोमुळे चर्चेत असते. मात्र, आता ती आपल्या एका खास इंटरव्ह्यूमुळे चर्चेत आली आहे. पुढच्या महिन्यात येणाऱ्या “व्हॅलेंटाईन डे’ची तयारी सगळे जण करायला लागले आहेत. कायलीने देखील या “व्हॅलेंटाईन डे’निमित्त खास बेत आखला आहे. “व्हॅलेंटाईन डे’ला काय घ्यायला आवडेल टेडी बेअर की ज्वेलरी असे जेव्हा तिला विचारले गेले, तेव्हा अर्थात ज्वेलरी, असे उत्तर कायलीने दिले.

तिच्या इंटरव्ह्यूमध्ये तिला मोत्याची ज्वेलरी की डायमंड ज्वेलरी असे विचारले गेले. त्यावर तिने “डायमंड ज्वेलरी’आपल्याला अधिक प्रिय असल्याचे सांगितले. कारण डायमंड हा तिचा पहिला पर्याय आहे. याशिवाय तिला “व्हॅलेंटाईन डे’ला सिनेमा बघायला आवडेल का बाहेर जायला आवडेल, असे विचारले असता “दोन्ही गोष्टी’ खूप आवडतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी करायला आपल्याला खूप आवडेल, असे कायलीने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“व्हॅलेंटाईन डे’च्या दिवसासाठी प्रत्येक गोष्टीचे दोन पर्याय तिच्यासमोर ठेवले गेले. त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिने आपला पर्याय तयार ठेवला आहे. पांढऱ्या गुलाबाच्या तुलनेत लाल गुलाब, डार्क चॉकलेटच्या तुलनेत मिल्क चॉकलेट, गुलाबाच्या तुलनेत रेड वाईन आणि लाल रंगाच्या तुलनेत गुलाबी रंग आपल्याला अधिक प्रिय असल्याचे तिने सांगितले.

मात्र ही सगळी तिच्याबाबतची खास बातमी नाही. खरी बातमी ही आहे की ट्रॅव्हिस स्कॉट बरोबर गुपचूपरितीने विवाहबद्ध झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट टाकली आहे. “मला नवऱ्याची खूप आठवण येते.’ असे तिने या पोस्टमध्ये लिहीले आहे. एका दुसऱ्या पोस्टमध्ये ती स्कॉटला “हबी’ म्हणत असल्याचेही लिहीले आहे. याचा अन्वयार्थ काय ते समजून घेता येऊ शकेल. आपल्या लग्नाच्या बातमीला तिने स्पष्टपणे दुजोराही दिला नाही आणि खंडनही केलेले नाही. “व्हॅलेंटाईन डे’ला खरे काय ते समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)