कायम विनाअनुदानीत शाळेतील सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा
मुंबई – अनुदानीत शाळेमधून सेवा निवृत्त झाल्यानंतर कायम विनाअनुदानीत शाळांमधील सेवा ही निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरावी, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.शिक्षकांची सेवा कायम विनाअनुदानीत शाळेतील अथवा अनुदानीत शाळेतील असा भेदभाव करता येणार नाही. राज्य सरकारच्या या संदर्भातील 1972च्या अध्यादेशामध्येही असा प्रकारचा कोणताही भेदभाव नाही, असे स्पष्ट करून एका शाळेच्या मुख्यध्यापिकेला दोन्ही शाळांमधील संपूर्ण सेवेचा समाविष्ट करून निवृत्ती वेतन देण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारला दिला.

सांताक्रूझ येथील सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ऍन्सेला डिसोझा यांच्या सेवानिवृत्तीवेतनात कायम विनाअनुदानीत शाळेतील सेवा समाविष्ट न करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मुख्याधापिकेच्या वतीने ऍड. नरेद्र बांदिवडेकर, ऍड. सागर माने यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी ऍड. नरेद्र बांदिवडेकर यांनी मुख्याध्यापीकेच्या वतीने युक्तीवाद करताना शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या सिस्टर ऍन्सेला डिसोझा यांच्या सेवा निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावात शाळेने मुख्याध्यापीका म्हणून 16 वर्षे 6 महिने आणि त्यापूर्वी कायम विनाअनुदानीत शाळेतील 12 वर्षे असा 28 वर्षे 6 महिने सेवेचा उल्लेख करताना राज्य सरकारच्या 1972च्या अध्यादेशाचा आधार घेतला होता.

मात्र राज्य सरकारने फेब्रुवारी1972च्या अध्यादेशात कायम विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांना सेवा निवृत्ती वेतन मंजूर करण्याबात कोणताही उल्लेख नसल्याने ही सेवा नाकारली आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना या अध्यादेशात सेवा नामंजूर करण्याचाही कोणताही उल्लेख नसल्याचे न्यायालयच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल न्यायालयाने घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)