कायमस्वरुपी नोकरीसाठी बनावट सह्या व शिक्‍यांचा वापर
पुणे, दि.25 – रोजंदारीवर काम करत असलेल्या जोडप्याने कायमस्वरुपी नोकरीत घ्यावे, यासाठी बनावट सह्या व शिक्‍यांचा वापर केला. यानंतर ही कागदपत्रे सादर करून त्यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी व फसवणूकप्रकरणी संबंधीत दाम्पत्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ग्लायडिंग सेटंर डीजीसीए येथील प्रभारी अनुपदेशक शैलेस चारभे (50,रा.कोंढवा) यांनी फिर्यांद दिली आहे. आरोपी उत्तम श्रीपती खंडागळे व त्याच्या पत्नी हे 13/5/2009 ते 4/1/2011 पर्यंत ग्लायडिंग सेंटर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीवर माळी काम करत होते. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या नावाचे तसेच प्रशासनिक अधिकारी अरिंदमडे यांचा खोटा शिक्का व सह्या करुन त्याद्वारे खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. यानंतर कामावर रुजू करुन घ्यावे, याकरीता कामगार न्यायालयात दावा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम.पी.भांगे तपात करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)