कायद्यापेक्षा पोलीस मोठे झाले का?

कॉल डिटेल्स रेकॉर्ड प्रकरण


हायकोर्टाचा संतप्त सवाल


ऍड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे आदेश

मुंबई – “कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ (सीडीआर) प्रकरणी ऍड. रिझवान सिद्दीकीला बेकायदा अटक केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ठाणे पोलीसांना उच्च न्यायालयाने आज चांगलेच फैलावर घेतले. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने ऍड. सिद्दीकीची अटकच बेकायदा असल्याचे स्पष्ट केले.

त्याबरोबर ठाणे पोलीस स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजतात का ? असा सवालही उपस्थित केला. सिद्दीकीला तातडीने सोडण्याचा आदेश देऊन संबंधीत अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीचे “कॉल डिटेल रेकॉर्डस’ (सीडीआर) बेकायदेशीरपणे प्राप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऍड रिजवान सिद्दिकीच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेबिअस कॉर्पस याचिकेची सुनावणी झाली. कोणतीही पूर्वकल्पना न देता रात्री उशिरा फौजदारी दंड संहितेच्या कलम 41 (1) अन्वये अटक केल्याचा दावा सद्दीकीच्यावतीने ऍड. रिझवान मर्चंट यांनी केला. तर ठाणे पोलिसांनी नियमानुसार अटक केल्याचा दावा केला.

परंतू अटकेचा समन्स अथावा बजावलेली नोटीस न्यायालयात सादर करता आली नाही. याची दखल न्यायलनाने घेतली. सिद्दीकीची अटक ही बेकायदा असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. सिद्दीकीला तुम्ही सोडणर का आम्ही आदेश द्यायचा, असा सवाल केला. यावेळी ठाणे पोलीसांनी माघार घेत रिझवानला सोडण्यास हरकत नसल्याची कबुली न्यायालया समोर दिली. न्यायालयाने सायंकाळी 5 पूर्वी सुटका करा असे आदेश देताना पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून आरोपीविरोधातील कारवाई करावी, अशी सूचना केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)