कायद्याच्या पातळीवर टिकणारे कालबद्ध आरक्षण देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : हिंसा आणि आत्महत्या न करण्याचे आवाहन
मुंबई – मराठा समाजाला कायदेशीर टीकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून कालबद्ध आणि योग्य वेळेत आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिली. मात्र, मराठा आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये. तसेच कोणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सरकारकडून मराठा नेत्यांसोबत बैठका घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमिवर राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत व मराठा समाजातील मान्यवरांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चेसाठी सरकारने आमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत 30 पैकी 26 जण उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये हनुमंत गायकवाड, सुरेश हावरे, अमोल कोल्हे, डॉ. आ. ग. साळुंके, अभिजित पवार, सयाजी शिंदे, पोपटराव पवार, नितीन चंद्रकांत देसाई, उद्योजक भैरवनाथ ठोंबरे, डॉ. सतिश परब, इतिहासकार पांडूरंग बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या. यामध्ये कायद्याबाबतच्या काही त्रुटींवरही चर्चा झाली. या मान्यवरांनी केलेल्या सूचनावरही विचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आंदोलनाची कोंडी फुटावी आणि चर्चेतून मार्ग निघावा, या हेतूने ही बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजासाठी सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कमी कालावधीच्या आणि दीर्घ कालावधीच्या मुद्दयांवर चर्चा झाली. त्याचसोबत निवदेनाद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)