कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळावे – शांताराम कुंजीर

शिरूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा वतीने संवाद यात्रेचे स्वागत

शिरुर- मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक पातळीवर असून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण समाजाला मिळावे, अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर यांनी येथे व्यक्त केली.
सध्या मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा शिरूर येथे आली असता ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चे हे देशात आणि परदेशात शिस्तबद्ध पध्दतीने निघाले. मराठा आरक्षण व समाजाच्या सर्वागीण मागण्याची तड लावण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्याचा उद्देशाने, समाजातील सर्व घटकांची मते जाणून घेण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा समारोप 26 नोव्हेंबरला विधानभवन, मुंबई येथे होणार आहे.
दरम्यान या संवाद यात्रेचे तालुक्‍यात न्हावरासह विविध गावांत स्वागत करण्यात आले. शिरूर शहरात बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेत शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे, प्राची दुधाने यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. सतीश धुमाळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)