कायद्याच्या कचाट्यात नवाज शरीफ…

केस लढवण्यास वकीलही मिळेना
इस्लामाबाद (पाकिस्तान) – माझी केस लढवण्यास कोणी वकीलही मिळेना अशी तक्रार भ्रष्टाचार मामल्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांनी केली आहे. शरीफ यांचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी सोमवारी शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची केस लढवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. एनएसी (नॅशन अकाऊंटिबिलिटी कोर्ट) मध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि शनिवारीही उपस्थित राहणे आपल्याला शक्‍य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असल्याचा शरीफ यांनी दावा केला आहे. कारण केसचा अभ्यास करण्यास वेळ मिळणार नसेल, आणि शनिवारीही कोर्टृात हजर राहावे लागणार असेल तर कोणताही वकील केस लढवण्यास तयार होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण दबावाखाली काम करू शकत नाही, आणि एनएसीच्या म्हणण्याप्रमाणे शनिवारी कोर्टात हजर राहू शकणार नाही असे त्यांचे आजवरचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी सांगितले, त्याचा संदर्भ शरीफ देत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्याय देताना घाईगडबड करणे म्हणजे न्यायाचा गळा घोटण्यासारखे आहे, ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मियां साकिब निस्सार यांना माहीत नाही काय? असा प्रश्‍न शरीफ यांनी केल्याचे मीडियाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)