कायद्याचा ड्राफ्ट तयार : क्‍लासेसला शुल्क ठरविण्याचा हक्‍क

समिती बैठकीमध्ये आमच्या 95 टक्‍के मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. क्‍लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती असणार आहे. त्याचे स्वरुप कसे असेल, त्यात कोण असेल हे अजून ठरायचे आहे. मात्र, क्‍लासेसचे शुल्क क्‍लासचालकच ठरविणार असल्याची आमची मागणी मान्य झाली हा आमचा मोठा विजय आहे.
बंडोपंत भुयार, सरकारी समितीतील सदस्य व प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष

कोचिंग क्‍लासेसवर आता सनियंत्रण समितीचे बंधन

पुणे – कोचिंग क्‍लासेसवर नियंत्रण असावे अशी पालक व विद्यार्थ्यांची असलेली मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कोचिंग क्‍लासचा कायदा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला मसुदा तयार केला असून त्यामध्ये सर्वानुमते कोचिंग क्‍लासवर सनियंत्रण समितीचे बंधन असणार असल्याचे ठरविण्यात आले आहे; तर कोचिंग क्‍लासचे शुल्क ठरविण्याचा अधिकार मात्र क्‍लासचालकांकडेच राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत कोचिंग क्‍लास ही एक समांतर शिक्षण व्यवस्था झाली आहे. यामध्ये हजारो विद्यार्थी शिकतात. शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत गोष्ट असल्याने या कोचिंग क्‍लासेसच्या काही चुकीच्या गोष्टींवर सरकारचे नियंत्रण असावे अशी मागणी सातत्याने होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीसाठी कोचिंग क्‍लास कायदा आणण्याचा निर्णय सरकार घेत आहे. याचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्‍त विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. यामध्ये माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे हे देखील आहेत. त्याची अंतिम बैठक बुधवारी पुण्यात झाली. या समितीत क्‍लासचालकांचे प्रतिनिधीही होते.
मसुद्यातील ठळक मुद्दे
– कायदा पहिली ते बारावी पर्यंतच्या क्‍लाससाठी कायदा
– क्‍लाससाठीचे शुल्क हे क्‍लासचालक ठरवतील परंतु त्याची माहिती समितीला द्यावी लागेल.
– पार्किंग क्‍लासचालकांचे अधिकृतच असावे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची मैदाने व रस्त्यावरील अधिकृत पार्किंग वापरता येणार
– नोंदणी शुल्क नोंदणी शुल्क तीन वर्षांसाठी पाचशे रुपये ते दीड हजार रुपयांपर्यंत
– क्‍लासमध्ये वेटिंग रुम नसेल तरीही चालेल
– क्‍लासच्या नफ्यातील एक टक्‍का रक्‍कम विकास निधी घेणार
– या विकास निधीला टॅक्‍समध्ये एक्‍झमशन मिळणार
– दर तीन वर्षांतून एकदा पडताळणी होईल.
– चुकीची पध्दत वगळता जाहिरात करता येईल.
– सर्व सोयी उपलब्ध असतील तर एका बॅचसाठी किमान 150 विद्यार्थी चालेल.
– क्‍लासेस व महाविद्यालयांच्या क्‍लासेसचा टायअप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
– क्‍लास व शाळेत शिकवणाऱ्या दुहेरी शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)